आसेगाव येथे क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वाय फोर् डी फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
दंत तपासणी नेत्र तपासणी प्राथमिक आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली
दिनांक 25 फेब्रुवारी रोजी आसेगाव येथे क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वाय फोर् डी फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आले यात शेकडो रुग्णांची तपासणी ही करण्यात आली दंत तपासणी नेत्र तपासणी प्राथमिक आरोग्य तपासणी व रक्त तपासणी ही करण्यात आली तपासणी करून रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले तसेच आसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना हातांच्या स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्यात आले प्रात्यक्षिकाद्वारे हातांची स्वच्छता कशी करावी हे ही सांगण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रफुल निकम अध्यक्ष वाय फोर्ड फाउंडेशन पुणे श्री प्रसाद दातार असोसिएट डायरेक्टर क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड श्री अभिनव अरोरा डायरेक्टर युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तालुकाध्यक्ष शिवनाथ मालकर हे उपस्थित होते कार्यक्रमास तालुका चिटणीस उदय मुळे सरपंच दीपक राजगुरू उपसरपंच विठ्ठल पल्लाळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे अंजली खंडाळे यांनी केले तर आभार कृष्णा खिल्लारे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवीन प्रयास बहुउद्देशीय संस्था औरंगाबाद संयम संस्था सातारा व मेहरून बाल विकास प्रेरणा केंद्र या संस्थांनी परिश्रम घेतले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?