स्पीड ब्रेकर चा अंदाज न आल्याने आज पुन्हा एकदा अपघात
लिंबे जळगावच्या बस स्टॉप मार्गावरील अपघात
लिंबे जळगाव : राष्ट्रिय महामार्ग औरंगाबाद अहमदनगर रोड ठिकाण लिंबे जळगाव बस स्टॉप येथे बसवण्यात आलेले स्पीड ब्रेकर असून अडचण नसून खोळंबा अशी गत झालेली आहे.
रहदारीचा ठिकाण असल्याने येथे रस्ता ओलांडण्यासाठी खुप वेळ लागायचा हे ध्यानात घेता वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणुन स्पीड ब्रेकर बसवण्यात आले पण या स्पीड ब्रेकर मुळे वाहनांचा वेग कमी तर झाला पण अपघाताचा वेग वाढला कारण हेच "स्पीड ब्रेकर" .
का ठरताहेत स्पीड ब्रेकर अपघातास कारणीभूत
ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी रस्त्याला थोडेसे वळण आहे आणि त्या मुळे स्पीड ब्रेकर चा अंदाज लागतच नाही की पुढे ब्रेकर आहे म्हणून.
ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पांढऱ्या रंगाची रंग रांगोटी करण्यात आलेली नसल्याने वाहन चालकास गती रोधकाचा अंदाज येत नाही त्यामुळे चालक गती कमी न करता वाहन चालवतो आणि गती रोधक जवळ येताच वाहन रोधकावर आदळते त्यामुळे चालक त्वरित ब्रेक लावतो आणी त्यामुळे त्याच दिशेने त्या गाडी मागून येणारे वाहन त्या पुढील वाहनास येवून धडकते. असे दर दिवसाला घडत असून रोडलागतचे सर्व व्यवसाय चालक ह्या त्रासाला कंटाळले असून स्पीड ब्रेकर साठी योग्य ते बदल करावे अशी विनंती करत आहेत.
आज दिनांक सोमवार 27 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 11 वाजेच्या सुमारास दहेगाव बंगला येथिल काही मंडळी लग्नासाठी बोलेरो गाडी ने औरंगाबादच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर गती रोधकाच्या ठिकाणी अहमदनगरच्या दिशेने येणारी कार गाडी येवून धडकली असता बोलेरो गडीमधील लहान मुले आणि वयोवृध्द महिला जोर जोराने रडू लागले काहींना गाडीचा दणका लागून दुखापत ही झालेली आहे.
दुखापत झालेल्यांना प्रथमोपचारसाठी खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?