शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट: रहीमपुर परीसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांसमोर पावसाळ्यात अतिवृष्टी, उन्हाळ्यात दुष्काळ आणि उरले सुरले ते योग्य भाव मिळत नाही अश्या अनेक समस्या
लिंबे जळगाव: गंगापूर तालुक्यात झालेला मुसळधार अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे रहीमपूर परिसरातील गहू मका आणि हरभरा या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. या पावसात अनेक शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले.
पावसाळयात अतिृष्टीमुळे भरपूर प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते आणि आता पुनः हे नवीन संकट आले. परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेले नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नसून पुन्हा एकदा नवीन संकट समोर उभे राहिले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सविस्तर माहिती अशी की सायंकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास पाऊस सुरू होताना प्रचंड वाऱ्याबरोबर गारा पडल्या. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे गव्हाचे उभे पीक आडवे झाले आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान केल, बागायतदारांचं हाता-तोंडाशी आलेलं पीक अस्मानी संकटांन ओढावून नेल्याने शेतकरी बेजार झाला आहे.
घेतलेले कर्ज आणि उसनवारीचे पैसे द्यायचे कसे असा प्रश्न आहे असे एका शेतकऱ्याने आमच्याशी बोलतांना प्रश्न मांडला तरी शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून योग्य ती मदत करावी अशी विनंती शेतकऱ्यांमधुन होत आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?