शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारून सरकारने वर्णभेदाची भूमिका घेतली :- मा. जयंतराव पाटील

शेतकरी वर्गात वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक असतात. त्यांना जात विचारून खत देणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने वर्णभेदाची किती आग्रही भूमिका घेतली आहे हे या भूमिकेतून निष्पन्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
शेतकऱ्याला जात विचारण्याचे कुठलेही कारण नाही. त्यामुळे या गोष्टीचा करू तेवढा निषेध कमी आहे. सरकारने ही भूमिका रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे विधानसभेत आपली भूमिका मांडेल, असे ते म्हणाले.
जातीचा, खताचा आणि शेतीचा कोणताही संबंध नसताना शेतकऱ्यांच्या जातिनिहाय संख्येचा आढावा घेऊन राजकारणातील पुढील पावले टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना खत देण्यासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. याचा करावा तितका निषेध कमीच आहे. सरकारची भूमिका ही जातीभेदास खतपाणी घालणारी आहे. सरकारने असे प्रकार ताबडतोब बंद केले पाहिजे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






