वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुका विस्तार कार्यकारिणी निवडीसाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न
गंगापूर- वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुका आढावा बैठक १० मार्च रोजी वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट व जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीदरम्यान त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज गंगापूर तालुका कार्यकारणी विस्तार करण्यासाठी शासकीय विश्रामगृह लासुर रोड गंगापूर येथे बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला सर्व आजी माजी व नव्याने तालुका कार्यकारिणीत काम करू इच्छित असणार्या सर्वांनी उपस्थितीती दर्शवली प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांनी दिलेल्या आदेशानुसार गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ सर्कल व पंचायत समितीचे अठरा सर्कल बांधणीचे नियोजन केले असून यानंतर तालुक्याची तालुका कार्यकारिणी बैठक तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद सर्कलच्या ठिकाणी घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे सध्या वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यकारिणी वर आहेत परंतु वेळोवेळी पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणे, आंदोलनात सहभागी न होणे, पक्षांचे क्रियाशील सभासद नोंदणी न करणे अश्या काही तालुका पदाधिकारी यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा सचिव संदीप गायकवाड, तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, जिल्हा सह संघटक सिध्दार्थ बनकर, तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव, वाल्मीक उत्तम दिवेकर . पवन मिलिंद साळवे,सरपंच अमोल शेजुळ, विनोद कचरू बागुल,कान्हु भालेराव, संतोष भुजंग, उस्मान शहा, किशोर बनकर, दत्ता गायकवाड, शांतावन उबाळे, अँड सुशीलकुमार शिराळे,अर्जुन अभंग, स्वप्नील बनसोडे, माजी सरपंच संतोष जाधव, रवि रत्नपारखे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते सदरील बैठकीचे प्रस्ताविक बाबासाहेब दुशिग यांनी केले तर आभार अर्जुन अभंग यांनी मानले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?