वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गंगापूर आणि लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल
गंगापूर आणि लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती
लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून वसू सायगाव येथील सरपंच शांताराम शेजुळ , दिनवाडा ग्रामपंचायत सरपंच शैलेंद्र गायकवाड, हमाल मापाडी मतदार संघातून गोविंद शेलार तर व्यापारी मतदार संघातून पंकज कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचं प्रमाणे गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सोसायटी संचालक तथा माजी सरपंच काकासाहेब दाणे भटके विमुक्त जाती जमाती मतदार संघातून तालुका अध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल यांनी ग्रामपंचायत मतदार संघ तर जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून अर्ज भरला आहे असुन गंगापूर व लासुर स्टेशन बाजार समितीच्या निवडणुकांचा आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने वंचित बहुजन आघाडी कडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही परंतु दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती गंगापूरची तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक, तर लासुर स्टेशनची जिल्हा सचिव संदीप गायकवाड यांनी दिली आहे उद्या पर्यंत सर्व उमेदवारांची यादी अधिकृत करण्यात येणार आहे यावेळी लासुर स्टेशन प्रसिद्ध व्यापारी वंचित बहुजन आघाडीचे नेते भारतशेठ पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा सचिव संदीप गायकवाड, तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल, लिंबे जळगाव सोसायटीचे चेअरमन कारभारी पाटील गोलांडे, वंचित बहुजन आघाडीचे पवन साळवे, अमोल शेजुळ, शहापूर घोडेगाव चे माजी सरपंच सिकंदर भाई पैलवान,सईद बाबा पठाण, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?