लिंबे जळगाव ग्रुप ग्राम पंचायत कार्यालयाला नवीन ग्राम सेवक देण्याची निवेदनाद्वारे मागणी
लिंबे जळगाव ग्रामपंचायतला ग्राम सेवक गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
लिंबेजलगाव, ता.9 (बातमीदार):
लिंबेजळगांव,रहीमपूर-अब्दलपूर येथील येथील ग्रुप ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी हे आपल्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायतीला वेळेवर येत नाही, सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहे.गाव विकासात्मक योजना व विकास कामांना खीळ बसत आहे,कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या बेजबाबदार ग्रामविकास अधिकाऱ्यांवर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करून त्यांची इतर ठिकाणी बदली करावी.आणि ग्रामपंचायत ला कायमस्वरूपी येणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशा मागणीचे निवेदन उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गंगापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना गुरुवारी (ता.6)रोजी दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, मौजे लिंबेजळगाव (ता. गंगापूर )येथील ग्रामविकास अधिकारी रमेश मुळ हे सतत कार्यालयात गैरहजर राहत असुन त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कामे खोळंबली आहेत.
ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांच्याकडे विटावा, जोगेश्वरी अश्या मोठ्या ग्रामपंचायती असल्याने मुळे ते लिंबे जळगाव ग्रामपंचायतीला वेळ देऊ शकत नाही.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकी नंतर आर्थिक व्यवहारा बदल विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेल आहे.
मार्च महिन्यात ग्रामपंचायतीचा कर वसुली होणे आवश्यक असताना ग्रामपंचायतिला येत नसल्याने वसुली रखडली आहे. ग्रामविकास अधिकारी मुळे यांचा आडमुठ्या धोरणामुळे वसुली थांबली आहे याला सर्वस्वी जबाबदार ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे आहे.
नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांचे रमेश मुळे फोन सुध्दा घेत नाही .त्यामुळे अश्या मुजोर ग्रामसेवकांचा तात्काळ कारभार काढून नवीन कायमस्वरूपी ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती लिंबे जळगाव ग्रामपंचायतीसाठी करावी.नसता आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य लोकशाही भार्गाने आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना माहितीस्तव सविनय सादर केली आहे.
या निवेदनावर उपसरपंच शेख हाशम , ग्रामपंचायत सदस्य शेख युनुस पटेल, माजी उपसरपंच व ग्रा.सदस्य सय्यद समीर ,माजी सरपंच तथा ग्रा.पं. सदस्य सय्यद अनिस पटेल,आसराबाई दाणे,शांताबाई जाधव, शेख सुम्मया,सविता गाडेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?