भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने अष्टांग योग मार्ग फाऊंडेशनच्या वतीने जयंती समिती कार्यकारिणी जाहीर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अष्टांग योग मार्ग फाऊंडेशन, छ. संभाजीनगर च्या वतीने योग गुरू तथा संस्थापक अध्यक्ष मा.रवि रत्नपारखे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी एक बैठक संपन्न झाली.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. जयंतीच्या अनुषंगाने विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला, बालक, युवक-युवातींसाठी योगविषयक विविध उपक्रम घेवून जयंती उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे व तसेच भडकल गेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देवून उपस्थितांना फळ वाटप करण्यात येईल व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असे एकमताने बैठकीत ठरले.
पुढील कार्यकारिणी -
अध्यक्ष- मा.रवि रत्नपारखे (योगगुरु) उपाध्यक्ष - डॉ.सुधाकर नरवडे, सचिव मा. किसन पा.नरोडे, सहसचिव - फैजल खान पठाण, स्वागताध्यक्ष - महिपाल मून कोषाध्यक्ष - अँड, विजय जोशी, सद्स्य मनोज सोनवणे, सिध्दार्थ शेजुळ, संजय तुपे, जितेंद्र सोनवणे, रविंद्र जाधव, सुरश वानखेडे, सागर रत्नपारखे, सदानंद खडसन लांडगे, रविंद्र वाघ या प्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
शेवटी कार्यक्रमाचे किसन पा.नरोडे यांनी सर्वाचे आभार मानले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?