मुस्लिम समजून गोरक्षकांकडून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या; पण तो अब्दुल नसून मिश्रा होता

गोरक्षकांनी आर्यन मिश्रा (मयत) च्या वडिलांना सांगितले - 'मला तो 'मुस्लीम' वाटला, मला 'ब्राह्मण' ला मारल्याचा पश्चाताप आहे.

Sep 4, 2024 - 22:32
Sep 4, 2024 - 23:21
 0  114
मुस्लिम समजून गोरक्षकांकडून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या; पण तो अब्दुल नसून मिश्रा होता
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

फरीदाबाद :- २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. आर्यन मिश्रा(१९), त्याची घरमालकीण सुजाता गुलाटी, तिची मुले (हर्षित, शँकी) आणि शेजारी कीर्ती शर्मासोबत कारने बडखल मेट्रो स्टेशनजवळ मॅगी खाण्यासाठी गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परततांना कार पटेल चौकाजवळ येताच मागून दोन कारमध्ये आलेल्या बदमाशांनी (कथित गोरक्षक) त्यांना थांबण्याचा इशारा केला. हर्षित गाडी चालवत होता. आर्यन पुढे बसला होता. हर्षितने गाडी थांबवण्याऐवजी कार वेगात चालवायला सुरुवात केली. कथित गोरक्षकांनी पाठलाग करत गोळीबार केला. सुरुवातीला हे टोळीयुद्धाचे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय होता.

माझा मुलगा गोरक्षक; त्याने गोळी मारली नाही

royal-telecom
royal-telecom

आर्यनच्या हत्येतील मुख्य आरोपी अनिल कौशिकच्या आईने आपला मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले. २३ ऑगस्टच्या रात्री तो आर्यनच्या कारचा पाठलाग करत होता, मात्र त्याने गोळीबार केला नाही. तो गायींचे रक्षण करतो.

सविस्तर माहिती अशी की बचावासाठी हर्षितने कार सुसाट वेगाने सिक्री पोस्ट ओलांडून पलवलच्या गडपुरी टोलचे बॅरिकेड तोडले. २५ किमी पाठलाग करत बदमाशांनी बघौला गावाजवळ आर्यनच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच आर्यन डॅशबोर्डवर पडला, हर्षित घाबरला, त्याने गाडी थांबवली, सर्व जण खाली उतरले, हात वर करत सर्व प्राणांची भीक मागू लागले. पण, कारमधून खाली उतरून एकाने आर्यनच्या छातीत पुन्हा गोळी झाडली आणि ते पळाले. याप्रकरणी पोलिसांनी अनिल कौशिक, वरुण, सौरभ, कृष्णा व आदेश यांना अटक केली आहे. या लोकांनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्यांना एसयूव्हीमधून गाय तस्करीची माहिती मिळाली होती. गाय तस्करीच्या संशयावरून आर्यनवर गोळ्या झाडल्या.

मला तो 'मुस्लीम' वाटला, मला 'ब्राह्मण' ला मारल्याचा पश्चाताप आहे. 

सियानंद मिश्रा जेव्हा फरिदाबादच्या स्थानिक तुरुंगात गेले तेव्हा त्यांच्या मुलाच्या खुन्याने त्यांच्या पायाला हात लावून माफी मागितली. 27 ऑगस्ट रोजी आरोपी अनिल कौशिकसोबत झालेल्या वेदनादायक भेटीची आठवण करून मिश्रा म्हणाले, “त्याने सांगितले की माझा मुलगा मुस्लिम आहे असे मला वाटत होते. आता त्याला ब्राह्मण मारल्याचा पश्चाताप होतोय.

अनिल कौशिक, वरुण कुमार, कृष्ण कुमार, आदेश सिंग आणि सौरव कुमार अशी आरोपींची नावे आहेत, त्यांच्यावर कलम 103 (1) (हत्या), 190 (बेकायदेशीर एकत्र येणे) आणि 191 (3 अंतर्गत अटक करण्यात आली आहे) (सशस्त्र असल्याने) प्राणघातक शस्त्रांसह).

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RIGHTPOST_HR राईटपोस्ट हरियाणा राज्य
royal-telecom
royal-telecom