शासकीय जमिनीवर घरे बांधून अतिक्रमण धारकांना नोटीसा न देण्याची वंचित बहुजन आघाडीची विभागीय आयुक्त कडे मागणी
विभागीय उपायुक्त यांचे समाधानकारक उत्तर शासनाला कळविण्याचे आश्वासन
औरंगाबाद पच्श्रिम तालुक्यातील शरणापुर येथील किमान २०० ते २५० शासकीय गायरान जमीन गट नंबर १ व २ मधील अतिक्रमण धारकांना अप्पर तहसीलदार औरंगाबाद यांनी अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत या विषयी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज विविध कार्यलयात निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अँड .बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन राज्यातील गायरान जमीनीवर असलेल्या अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यांत येऊ नये अशी भुमिका घेतली यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोटिसा देणार नाही असा शब्द देऊन ही नोटिस बजावल्या जात आहे याकडे अप्पर तहसीलदार हे दौऱ्यावर असल्याने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यांनी वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आहेत असे सांगितल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आवक शाखेत निवेदन दिले तर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून उपायुक्त महसूल यांना भेटून निवेदन दिले आणि सविस्तर चर्चा केली त्यांवर सदरील निवेदन व आपल्या भावना शासनाला कळविण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी तालुकाध्यक्ष अंजन साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा सदस्य पी के दाभाडे, तालुका महासचिव एस पी हिवराळे, तालुका उपाध्यक्ष सतीश महापूरे, तालुका कोषाध्यक्ष सुगंध दाभाडे, जिल्हा कार्यकारिणी संघटक हरिदास बोर्डे, तालुका संघटक अशोक त्रिभुवन, रविकुमार रत्नपारखे, आदींसह शरणापुर येथील अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?