अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
लिंबे जळगाव येथील घटना

लिंबे जळगाव : येथे एका ट्रॅक्टर ट्रॉली ला आणि ऊसाला शनिवारी अचानक आग लागली. या आगीत सुमारे एक ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
लिंबे जळगाव येथील शेतकरी कदीर वाहिद शेख यांचे घराबाहेर उभे असलेले ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये ठेवलेल्या उसाला अचानक आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले व बाजूला असलेले कुट्टी मशिन आणि जनावरांच्या चाऱ्यालाही घेरले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घराकडे धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत ऊस/चारा, ट्रॅक्टर ट्रॉली, कुट्टी मशिन जळून खाक झाला होता. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे १००००० ते २००००० रुपयांचे नुकसान झाले. संबंधित शेतकऱ्याने अज्ञाताविरोधात फिर्याद दिली असून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.
What's Your Reaction?






