मुंबई येथील आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले

मुंबई येथील आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळाचे नेतृत्व युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केले या शिष्टमंडळात युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्य सदस्य अमित भूईगळ, जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले, जिल्हाध्यक्ष योगेश बन उपस्थित होते यामध्ये म्हटले आहे की वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशुर व गौतम हराळ या पदाधिकाऱ्यांवर दिनांक 27 मे रोजी सायंकाळी सहा वाजता आंबेडकर भवन बाहेर प्राण घातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दोन्ही पदाधिकारी गंभीर जखमी असून त्यांचावर मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत घटना घडून दोन दिवस झाले तरी मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली नाही या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा मा रेखाताई ठाकूर यांनी जगदीश गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त केला आहे त्यामुळे जगदीश गायकवाड यांच्यावर ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा त्यांचा संपत्तीची चौकशी करावी करण्यात आल्या आहे त्या दिशेने तपास होणे अपेक्षित होते परंतु मुंबई पोलीस हातात हात घालून बसले आहे या घटनेचा वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करीत असुन सरकारने हस्तक्षेप करून मुंबई पोलीस आयुक्त व पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत लवकरात लवकर आरोपींना व त्यामागील मास्टर माईंडला अटक करावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पुर्व प्रभाकर मामा बकले, जिल्हाध्यक्ष पच्श्रिम योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महासचिव शाम भारसाकळे, जिल्हा महासचिव अँड पंकज बनसोडे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वंदना नरवडे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे,अंजन साळवे, युवा शहराध्यक्ष पुर्व आपसर पठाण, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव,शेख युनुस पटेल, युवा जिल्हा महासचिव सलिम पटेल, जिल्हा संघटक अँड सागरदास मोरे,पी के दाभाडे, हरिदास बोर्डे,एस पी हिवराळे, सतीश महापूरे,सुगंध दाभाडे, पंडितराव तुपे, शाहीर मेघानंद जाधव, रामेश्वर दाणे, महिला आघाडीच्या जिल्हा सहसचिव सुलोचना साबळे, संतोष जाधव,रवि रत्नपारखे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
1
What's Your Reaction?






