पुन्हा राडा: औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात दोन गटात राडा.
राइटपोस्ट प्रतिनिधी
:- मोहम्मद आवेज ━━━━━━━━━━━━━
????????♂️ औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील शेलगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत मशीदसमोर डीजे वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूने हल्ल्यात व दगड विटांचा मारहाणीत रुपांतर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही गटाच्या 80 ते 100 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्या या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
????️ याबाबत सविस्तर माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील च्या शेलगाव येथे फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील मंडळी लग्नसोहळ्यासाठी आली होती. लग्नातील नवरदेवाची वरात मिरवणूक सुरू असताना वरात शेलगाव येथील मशिदीसमोर आली. यावेळी काही लोकांनी मशीदसमोर डीजे बंद करण्याची विनंती केली.
???? मात्र मशिदीसमोर डीजे वाजवू नका, तशी प्रथा आमच्या गावात नाही असे एकाने वरातील नाचणाऱ्या तरुणांना सांगितले. बोलताबोलता वाद वाढला. एका गटाच्या आरोपीने थेट चाकूने दुसऱ्या गटाच्या व्यक्तीवर हल्ला करत वार केला. हल्ल्यात दोन्ही गटांतील दोघे गंभीर जखमी झाले.
????????♂️ *80 ते 100 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल...*
या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा पिशोर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या काहीजणांविरुद्ध गुन्हे नोंदण्यात आले आहेत. दोन गटांत वाद होण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य करून चिथावणी दिली, जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू, दगड, विटाच्या सहायाने गंभीर जखमी केले म्हणून पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
What's Your Reaction?