लिंबे जळगाव ग्राम पंचायत (रहीमपुर/अब्दुलपूर) मासिक सभा होते बंद खोलीत
खोलीबाहेर काडले जाते ग्रामस्थांना, नियम फक्त कागदावर मर्यादित

लिंबे जळगाव : मार्च 2021 ला आलेल्या एका आदेशानुसार ग्रामस्थांला ग्राम पंचायत मासिक सभेला उपस्थीत राहण्याचे अधिकार आहे पण गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव ग्राम पंचायत या आदेशाला झुगारून देत आहे.
मासिक सभेला फक्तं ग्राम पंचायत सदस्यांनाच बसायचे अधिकार आहेत असे कर्मचारी सांगतात आणि ग्रामस्थांना खोली बाहेर हाकलून लावतात.
महीला सदस्य सभेला उपस्थीत न राहता त्यांचे पतिदेव उपस्थीती दर्शवतात.
ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा म्हणून राज्य शासनाने १९ सप्टेंबर १९७८ रोजी काढलेल्या शासकीय परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या मासिक सभांमध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांना उपस्थित राहता यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.
ग्रामपंचायतीच्या सभेबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. पीआरसी १०७७/ २७०३/ सीआर (२७३२) दि. ११/९/१९७८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील मुंबई ग्रामपंचायत (सभा) बाबत नियम १९५९ (क. १७६ (२) खंड (७) मधील नियम १ टीप १ मधील ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतुदी या स्वयंस्पष्ट आहेत.
What's Your Reaction?






