राज्यातील नांदेड, लातूर, मुंबई येथील हत्येच्या व कन्नड येथील मुस्लिम महिलेला विवस्त्र करून झालेल्या मारहाण च्या संदर्भात आज तहसीलदार गंगापूर यांना निवेदन देण्यात आले
वंचित बहुजन आघाडी गंगापूर
राज्यातील नांदेड, लातूर, मुंबई येथील हत्येच्या व कन्नड येथील मुस्लिम महिलेला विवस्त्र करून झालेल्या मारहाण च्या संदर्भात आज तहसीलदार गंगापूर यांना निवेदन देण्यात आले नांदेड जिल्हयातील बोंढार हवेली येथील बौद्ध तरुण अक्षय भालेराव यांची दिनांक १ जुन २०२३ गुरुवार रोजी सायंकाळी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून हत्या करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी केली यांचा राग धरून गावगुंडांनी अक्षय भालेराव यांची हत्या केली अक्षय भालेराव यांची नियोजित पध्दतीने हत्या केली असून यामागे राजकीय पक्षाचे नेते असल्याचे समजते त्यामुळे या प्रकरणांत हत्येचा कट रचणे कलम १२० ब लावून या घटनेमागील सत्य शोधून त्यांना आरोपी करण्यात यावे आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे वकील समाजकल्याण विभागाने द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे
अक्षय भालेराव प्रकरण क्षमत नाही तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मातंग बांधवांची सावकाराने व्याजाच्या पैश्यासाठी मातंग बांधवांची हत्या केली मुंबईत वसतीगृहात राहुन उच्च शिक्षणासाठी विदर्भातील अकोला जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या एका बौद्ध मुलीचा मृतदेह वसतीगृहातील खोलीत नग्न अवस्थेत सापडला आहे मृतदेहावरूण या मुलीवर सामूहिक अत्याचार करून मारून टाकल्याचे दिसते तेही अत्यंत व्हीटी सारख्या व्हीव्हीआयपी ठिकाणी यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असुन कायद्याचा धाक राहिला नसण्याचे दिसते या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत असुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आरोपींना अभय देणार्याविरोधात सुध्दा गुन्हे दाखल करण्यात यावेत
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मातंग समाजाचे गिरिधर तपघाले यांना एका सावकाराने तीन हजार रुपयांचे व्याज दिले नाही म्हणून घरांत घुसून डोळ्यात मिरची पुंड टाकुन रॉडच्या साह्याने जिवंत मारले असुन हा खटला सुध्दा जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा त्याचं प्रमाणे रेणापूर चे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी अवैध सावकारी व्यवसायावर कायद्याने आळा घालणे त्यांची जबाबदारी आहे सावकरीच्या व्याजाच्या पैश्यासाठी एका मातंग समाज्याच्या माणसाला जिव गमवावा लागतो मयत गिरीधर तपघाले यांची हत्या सावकरीच्या पैश्यासाठी झालीं असताना सुद्धा सहाय्यक निबंधक व लातूर येथील जिल्हा उपनिबंधक यांनाही दखल घेतली नाही यांच्याच अर्थ संबंधित अधिकारी यांचे सावकारी व्यवसाय करणारा वर नियंत्रण नाही म्हणून दोन्ही अधिकार्याना याप्रकरणात सह आरोपी करण्यात यावे व त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच रेणापूर येथील मातंग समाजाला आणि पंडितांच्या
कुटुंबाला पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे या आरोपी सावकाराची संपत्ती जप्त करण्यात यावी सावकाराचे आजपर्यंत चे सर्व व्यवहार तपासावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पिशोर पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी कोमल शिंदे यांनी आपल्या पुरुष कर्मचारयाना सोबत घेऊन शेलगाव येथील शबाना पटेल या मुस्लिम महिलेला तिच्या घरात घुसून बेदम मारहाण केली या प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करून दोषींना निलंबित करण्यात यावे एकीकडे समाजात बौद्ध मातंगावर जातीयवादातून हल्ले करून हत्या करीत असुन दुसरीकडे पोलिस अधिकारी मुस्लिम महिलेला विवस्त्र करून मारहाण करत आहे वरील मागण्यांसंदर्भात शासनाने तात्काळ कार्यवाही करावी व चारही घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात न्यायाधीशांच्या समोर घेण्यात याव्यात दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा सचिव संदीप गायकवाड, तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग. दिलीप आरक, कान्हू भालेराव, सचिन भुजंग,विशाल पठारे, वाल्मीक दिवेकर, पवन साळवे, गोविंद शेलार, संतोष पाटील वंजारे, विजय भाले, शरद पगारे,आसिफ शहा, भिमराज गायकवाड, कुणाल बागुल, स्वप्निल बनसोडे, आदीं उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?