वारकरीयांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकारी यांना निलंबित करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागावी
वंचीत बहुजन आघाडीची मागणी

वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने विभागीय आयुक्त यांना भेटून निवेदन दिले यांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी, आळंदी सोहळ्यात दरम्यान पोलिसांनी वारकरी यांच्यावर लाठीचार्ज केला असुन सदरील घटना हि अत्यंत दुर्दैवी असून वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करते. या अगोदर कधीही अशी घटना घडली नसुन वारकरी नियमत मंदिरात दर्शन घेत असत परंतु पोलीस प्रशासन वारकरी यांना मंदिरात जाण्यास मज्जाव करत आहेत आणि प्रशासनाचे वारकरी बाबत सकारात्मक संवाद नसल्याचे हे लक्षण असुन याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असुन आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे एकतर महाराष्ट्रात सगळीकडे दलित बांधवांवर अत्याचार वाढले असून यातून हत्या सुध्दा झाल्या आहेत
काल आळंदी येथे झालेल्या वारकरीयांवर लाठीचार्जचा प्रकार झाला त्याचं प्रमाणे पारधी समाजातील अनेक लोकांना पोलिसांनी डांबून ठेवले त्यांना वारीत सहभागी होऊ दिले नाही यांवरून सरकारची निती लक्षात येते हि घटना सुध्दा अत्यंत गंभीर असुन या सर्वांवर कार्यवाही करावी ही मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. त्याचप्रमाणे या अगोदर सुध्दा कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील मुस्लिम महिलेला पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी मिळून मारहाण केली आहे यावरुन राज्य सरकारचे पाठबळ असल्याचा आमचा आरोप आहे आळंदी येथील घटनेला दोषी असणार्या सर्व पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे याप्रकरणी कार्यवाही झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महासचिव ॲड. पंकज बनसोडे,जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती,गणेश खोतकर जिल्हा संपर्कप्रमुख, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






