वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पत्रकार परिषद
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी 18 जून 2023 रोजी खुलताबाद येथे राज्यस्तरीय प्रतिनिधी बैठकीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बीड जिल्ह्यातील परळी पोलिस स्टेशन मध्ये पोलिस कोठडीत असलेले जरीन खॉन यांच्या मृत्यू झाला यांचा निषेध आणि त्या मुस्लिम कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे त्यांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी म्हणून मोर्चे काढण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 4 जुलै 2023 रोजी सकाळी 11:३० वाजता भडकल गेट येथून मोर्चा काढण्यात येणार आहे सदरील मोर्चा बुढीलाईन मार्गे चेलीपुरा चांदणे चौक होऊन विभागीय आयुक्त कार्यालया वर हा भव्य मोर्चा पोहोचणार आहे या मोर्चात
औरंगाबाद येथील किराडपूरा दंगलीत मुत्यु झालेल्या शेख मुनीर,आणि समीर खान यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात यावी चौकशीअंती दोषीविरोधात कार्यवाही करावी व त्या पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने करावी अशीही मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात येणार आहे त्याचं प्रमाणे कन्नड तालुक्यातील अंमळनेर येथील शबाना पटेल यांना पिशोर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली या घटनेची चौकशी करून सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विरोधात कडक कारवाई करावी व चौकशी होई पर्यंत त्यांची मुख्यालयात बदली करावी हि सुध्दा मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार आहे या मोर्च्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत मुस्लिम बांधवांनी सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात येत आहे या पत्रकार परिषदेला मराठवाडा सचिव तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष योगेश बन शहराध्यक्ष मध्य जलीस अहेमद यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले यावेळी युवा शहराध्यक्ष आपसर पठाण, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पी के दाभाडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अक्रमखान, युवा जिल्हा उपाध्यक्ष शादाब सिद्दीकी, शहर उपाध्यक्ष मुस्तफा बेग आदींची उपस्थिती होती.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?