विविध जनहितार्थ मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुक्यांच्या वतीने भडकल गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा
हजारोंच्या संख्येने महिला युवक उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुक्यांच्या वतीने भव्य मोर्चाचे भडकल गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयावर आज आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहराध्यक्षा वंदना नरवडे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पी के दाभाडे, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव,जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, जिल्हा संघटक बाबा पटेल, हरिदास बोर्डे, तालुका महासचिव एस पी हिवराळे, तालुका उपाध्यक्ष सतीश महापुरे, प्रेम बनकर, अशोक त्रिभुवन, महिला आघाडीच्या जिल्हा सहसचिव सुलोचना साबळे, आदींसह जिल्हा शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या
औरंगाबाद तालुक्यातील शासकीय भूखंडावरील अतिक्रमण कायम करण्यात यावे
शासनाने शासकीय जमिनीवर घरे बांधून राहत असलेल्या गोर गरीब नागरिकांना नोटिसा बजावल्या त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात.तिसगाव येथील शासकीय जमिन ही ग्रामपंचायत च्या ग्रामसभेची मान्यता न घेता हस्तांतरित करण्यात आली ते हस्तातरण रद्द करण्यात यावे .
महानगर पालिका औरंगाबाद ला 86 हेक्ट्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली त्या पैकी नागरी वसाहत,निवासी अतिक्रमण,धार्मिक स्थळे च्या ताब्यातील 40 हेक्ट्टर जमीन सोडण्यात यावी. शरणापुर आणि तिसगाव रमाई आंबेडकर नगर येथील नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या त्याबाबत खुलासे सादर करण्यात आले त्यानुसार त्यांना मालकी हक्क व कब्जादार घोषित करण्यात यावे .
साजापुर् येथील शासकीय जमिन ही गट नंबर,44, 45 आणि 46 स्थानिक ग्रामपंचायत अथवा स्थळ पाहणी न करता परस्पर जिल्हा उद्योग केंद्र यांना हस्तांतरित करण्यात आली त्यातून स्मशान भूमी, कब्रथान, बुध्द विहार, शाळा आणि काही घरे झाली आहे त्या जागा सोडण्यात याव्यात व उर्वरित जागा ही जिल्हा उद्योग केंद्राच्या नावे करण्यात यावी तशी दुरुस्ती करावी .
कांचीपुरा येथील गट नंबर 122 मधील निवासी अतिक्रमण कायम व कब्बजेदार घोषित करण्यात यावे .
गोलवाडी येथील समाज मंदिर, सभाग्रह साठी शासकीय जमिन मिळावी यासाठी ग्रामपंचायत ने मागणी केली आहे ती जमीन मंजूर करण्यात यावी व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा .
दौलताबाद, माळीवाडा, साजापूर्, करोडी, शेरणापुर , तिसगाव, वडगाव को,पंढरपूर , वळदगाव,तसेच संपूर्ण जिल्ह्यातील आणि औरंगाबाद पश्चिम तालुक्यातील संपूर्ण शासकीय जमिनीवर घरकुल योजना राबविण्यात यावी.
शासकीय जमिनीवर जी घरे आहेत त्यांना महाराष्ट्र शासन असे नमुना नंबर-8 उतारा वरती नोंद आहे भोगवटा मधील ते काढून मालकी हक्क मध्ये नोंद घेण्या साठी आदेशित करावे.सर्व अतिक्रमण धारक यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात त्यात पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज,इतर सुख सुविधा देण्यात याव्यात. स्वस्त धान्य दुकान मधून जे प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ऐवजी प्रत्येक कुटुंबाला दरमहा 25 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मंजूर करण्यात याव्यात.शेतकरी कुटुंबाला पूर्वी प्रमाणे विकत चे धान्य द्यावेत खात्यात पैसे देण्यात येऊ नये. स्वस्त धान्य दुकान वर पूर्वी सर्वांना विकत चे धान्य मिळावे . तिसगाव ते छावणी हा रस्ता रहदारी साठी बंद आर्मी कॅम्प ने बंद केला आहे तो पूर्वी प्रमाणे रहदारी साठी सुरू करण्यात यावा दुरुस्ती करावी.
वाळुंज एम आय डी सी येथे गरूडझेप अकादमी नावाने पोलिस भरतीसह विविध कोर्सेस करण्यासाठी विद्यार्थी भरून त्यांना राजकीय कार्यक्रमात बाऊनसर म्हणून वापर केल्य जात असल्याचे ३० जुन २०२३ रोजी गंगापूर येथे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभेदरम्यान या गरुडझेप अकादमी च्या विद्यार्थ्यांनी तेथे आलेल्या वेगवेगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांना मारहाण करण्यात येत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आले आहे त्यामुळे या अकादमीच्या मालका विरोधात गुन्हा दाखल करावा व या अकादमीची मान्यता रद्द करावी .पंढरपूर या ग्रामपंचायत ला महसुली दर्जा देण्यात यावा तसेच प्रलंबित घरकुले मंजूर करण्यात यावे .सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी.
अशोक त्रिभुवन, गणेश गाडेकर , हरदास बोर्डे, अरविंद पवार, शशिकांत गोफने, तौफिक शेख, किरण साळवे ,निसार शेख, विक्की किर्तीशही,कृष्णा खोतकर ,सुनील जोगदंड, रमेश दाभाडे,महेंद्र तायडे , हजारोंच्या संख्येने महिला युवक उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?