लिंबे जळगाव ग्राम पंचायत कार्यालयात नव्याने नियुक्त ग्राम सेवक यांची रहीमपूर आणि अब्दुलपूर गावात पाहणी
लिंबे जळगावचे सरपंच नवनाथ वैद्य आणि ग्रामसेवक नारायण रावते सर यांची रहीमपूर आणि अब्दुलपूर गावाला भेट
लिंबे जळगाव : औरंगाबाद अहमदनगर रोड पासून फक्त 500 मीटर अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव रहीमपूर, गावाची लोक संख्या 700 ते 800 च्या आसपास. आणि बाजूलाच 500 मीटर अंतरावर अब्दुलपूर हे गाव जेमतेम 300 च्या आसपास लोकसंख्या असलेले गाव. दोन्ही गावे लिंबे जळगाव ग्राम पंचायत ला जोडलेली आहे. तिन्ही गावे मिळून ग्रुप ग्राम पंचायत आहे .
महामार्गावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांत अजून ही विकास म्हणून कोणीही उदयास आलेले नव्हते. गावात सरळ रस्ता नव्हता (नविन रस्ता काहीच महिन्या पूर्वी करण्यात आला) गल्यांमध्ये आज ही चिखल आहे, नळांना आठ दिवसा आड पाणी सोडल्या जाते, गावात रोजगार हमी चे कामे मुळीच नाही, कोणत्याही प्रकारची जनजागृती कधीच होत नाही, आरोग्य सेवा नाही असल्या अनेक समस्यांनी घेतलेली दोन्ही गावे.
नविन वर्षात नविन ग्राम पंचायत बॉडी निर्माण झाली आणि गावाला नविन ग्राम सेवक ही लाभले आणि गावात काही प्रमाणात कामे व्हायला सुरुवात झाली. गावातील जिल्हा परिषद शाळेला पेव्हर ब्लॉक आणि मुख्य रस्त्यावर भूमी अंतर्गत नाल्या करण्यात आले. याच अनुषंगाने आज दिनांक 7 जुलै रोजी नव निर्वाचित सरपंच (नवनाथ वैद्य) व ग्रामसेवक (नारायण रावते सर) यांनी भेट दिली व लोकांच्या समस्यांची पाहणी केली व सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
गावातील गल्यांमद्ये सिमेंट रस्ते, भूमी अंतर्गत नाल्या, तसेच स्वच्छता गृह आणि गावातील गरजूंना घरकुल योजना राबवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहे आणि त्यासाठी पुढचे पाऊल ही उचलले असल्याचे सांगितले आहे.
या वेळेस गावातील खूप ग्रामस्थांनी आपल्या समस्या/सुझाव सरपंच आणि ग्रामसेवक साहेबांच्या समोर मांडले.
गावात जलजिवन योजने अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली व गावातील गल्यांमधे टाकण्यात आलेल्या मुरुमाची पाहणी केली .
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?