वंचित बहुजन आघाडी गंगापूर च्या वतीने गंगापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न
२० जुलै रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे
वंचित बहुजन आघाडी गंगापूर च्या वतीने आज दिनांक 16 जुलै २०२३ रोजी गंगापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती सदरील बैठकीत २० जुलै रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे यांत गंगापूर तालुक्यातील गायरान अतिक्रमण धारकांच्या प्रश्नांसाठी सदरील बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल होते यावेळी मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे, तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन भुजंग,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते,महिला आघाडीच्या तालुका महासचिव ज्योती मंजुळे, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सविता हिवाळे,मरियान जॉन्सन केजे, सुमनबाई बनकर,छाया वाणी, दिक्षा आळणे,हिरा मुडलिक,मिना बोरूडे,मिरा सोनवणे,सरला जाधव, विजय मंजुळे,मोहन रोडगे, इस्माईल सय्यद, रघुनाथ भालेराव,गोरख शिंदे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या वेळी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद इस्माईल हबीब पटेल, गोळेगावचे मोहन रोडगे, गंगापूर शहरातील रघुनाथ भालेराव यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला त्यांचा जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी पक्षांचा रुमाल घालून सत्कार केला.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?