रस्त्यावर पाणी , चिखलमय रास्ता आणि उडणारे पाणी आशा अनेक समस्या बेजार लिंबे जळगावकर , काय आहे स्थिती?
ग्रुप ग्रामपंचायत लिंबे जळगाव (रहीमपूर/अब्दूलपूर) रस्ता आणि स्वच्छते अभावी त्रस्त नागरिक
लिंबे जळगाव : उकाड्यामुळे बेजार झालेल्या लिंबे जळगावकरांना पावसामुळे दिलासा मिळाला खरा, पण कच्चे रस्ते चिखलाने माखले, तेथील खड्ड्यात पाणी साचले. तेथून भरधाव जाणारे दुचाकीस्वार इतरांच्या अंगावर चिखल, पाणी उडवत जात असल्याने अनेकांचे कपडे खराब होत आहे.
पावसाळा सुरू झाला आणि ग्राम पंचायत लिंबे जळगाव अंतर्गत झालेल्या विकास कामाचे बिंग फुटु लागले, गल्लीबोळातील रस्त्यांना ओड्याचे व नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, दर दिवस कुठे ना कुठेतरी रोड नाली कामाचा शुभारंभ करणाऱ्या ग्राम पंचायत कार्यालयाला गल्लीबोळातील नाल्या ड्रेनेज साफसफाई स्वच्छता मोहीम करण्याची गरज भासलेली दिसत नाही, अंडरग्राउंड ड्रेनेज व पाण्याच्या पाइपलाइन सर्वच रोडची दुरावस्था झालेली आहे आणि खड्ड्या मध्ये साचले आहे पाणी, चिखलमय रस्ते, यावर्षीच्या पहिल्याच पावसात लिंबे जळगाव स्वच्छ भारत मिशन चे तीन तेरा वाजले आहेत, जुन्या गाव भागांमध्ये गल्लीबोळातील रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप आले आहे, प्रचंड प्रमाणात घाण, दुर्गंधी पसरली आहे, गावाच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या ग्राम पंचायत कार्यालयाने त्याकडे तात्काळ लक्ष घालून ही तुंबलेली रस्ते व नाले साफ व स्वच्छता अभियान करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गावात 4 वॉर्ड असून प्रत्येक वॉर्ड मधून तक्रार होतांना दिसत आहे . वॉर्ड क्रमांक 1 मध्ये जिथे गरज नाही तिथे रस्त्याचे काम करण्यात आले आणि जिथे गरज होती तिथे काम अपूर्ण सोडून देण्यात आले आहे असे नागरिकांकडून तक्रार करण्यात येत आहे .
गावात फक्त पुढारी लोकांचेच कामे केली जातात अशी ही तक्रार आम जनतेकडून करण्यात येत आहे , अश्या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे ही विंनणती नागरिकांकडून करण्यात येत आहे .
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?