लिंबे जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून बदली झालेल्या राठोड,नेहुल, वाबळे या शिक्षकांना निरोप
लिंबे जळगाव येथे शिक्षक म्हणून केलेली नोकरी अविस्मरणीय अनुभव होता तिन्ही शिक्षकांचे गौरवोउदगार
लिंबे जळगाव - गंगापूर तालुक्यातील नगर औरंगाबाद हायवे रोड असलेल्या लिंबे जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री बबन राठोड यांची वाळुंज,विद्या नेहुल वैजापूर, गीतांजली वाबळे गुरूधानोरा ता गंगापूर येथे प्रशासकीय कारणाने या नवीन शालेय वर्षांत ऑनलाईन बदल्या झाल्या होत्या त्यांना आज लिंबे जळगाव येथील शालेय व्यवस्थापन समिती व गावकरी शिक्षकांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यातीन्ही शिक्षकांनी लिंबे जळगाव येथे दिर्घकाळ नोकरी केली त्यात बबन राठोड यांनी बारा वर्षे विद्या नेहुल अकरा वर्षं गीतांजली वाबळे यांनी दहा वर्षे शिक्षक म्हणून सेवा दिली त्यांचा काळातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असुन विद्यार्थीप्रिय आणि आपल्या कामाशी प्रामाणिक शिक्षक असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली यावेळी आपले अनुभव कथन करताना विद्या नेहुल, गीतांजली वाबळे यांना भावना अनावर झाल्या होत्या यावेळी विद्या नेहुल म्हणाल्या मी अकरा वर्षापूर्वी या शाळेवर आले त्यावेळी एक दडपण होते या गावाबद्दल वाईट चर्चा ऐकायला मिळत होती परंतु गेल्या अकरा वर्षांत या गावात नोकरी केली त्यांचा अनुभव अत्यंत सकारात्मक होता अत्यंत चांगले गाव अत्यंत चांगले गावकरी असे अनुभव त्यांनी मांडले गीतांजली वाबळे यांनी या शाळेत मला सर्व शिक्षकांनी समजून घेतले आणि सहकार्य केले त्याबद्दल सहकारी शिक्षकांचे आभार मानले तर राठोड सर यांनी बारा वर्षांतील आपला अनुभव कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला मी या शाळेतून बदलून जाताना म्हणालो होतो मी पुन्हा येईन मी पुन्हा आलोच परंतु श्रीमती राठोड यांच्या रुपाने असे श्री राठोड म्हणाले यावेळी सर्व सहकारी शिक्षकांनी सोबत काम केल्याचे अनुभव कथन केले यावेळी नवीन बदलून आलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रुपचंद गाडेकर, सरपंच नवनाथ वैद्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर दाणे, ग्रामपंचायत सदस्य शेख युनुस रज्जाक पटेल, उर्दू माध्यमांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोईस सय्यद,नबी खालू,शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री शेख सत्तार सर, मोरे सर, उर्दू माध्यमांचे मुख्याध्यापक इरफान पठाण सर, शिक्षक सर्वश्री खाॅजासर,माधव कोरे,राजेंद्र बाणेदार, श्रीमती नंदा मेहेर, श्रीमती यास्मिन शेख, श्रीमती फरीन शेख, श्रीमती लता तुपे,श्रीमती जलदेवी पटवारी ,श्रीमती सुवर्णा लाडणे,श्रीमती तब्बसूम कौसर, शिक्षक,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?