वंचित चे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने

मणिपूर मधील ‘कुकी’ या आदिवासी जमातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ

Jul 28, 2023 - 21:27
 0  98
वंचित चे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने आज दिनांक 28 जुलै दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले 
सदरील आंदोलनाचे नेतृत्व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, शहराध्यक्षा वंदना नरवडे यांनी केले यावेळी मराठवाडा सचिव तय्यब जफर, मराठवाडा संघटक महेश निनाळे, मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे,महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे,आदींची प्रमुख उपस्थिती होती 
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मणिपूर येथे ‘मैतेई’ आणि ‘कुकी’ व ‘नागा’ व इतर आदिवासी जमातीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता दंगल, जाळपोट आणि नरसंहारापर्यंत पोहोचला आहे. हा संघर्ष मैतेई या उच्च जाती जी हिंदू आहे त्यांना कुकी, नागा प्रमाणे आदिवासींचा दर्जा हवा आहे, तर कुकी, नागा व इतर आदिवासी जमाती या मणिपूरच्या डोंगर माथ्यावर राहत आहे
    जाणकार अभ्यासाकांच्या मते मणिपूरच्या या पहाडांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती दडली असून कुकी व इतर आदिवासी जमातीच्या वास्तव्यामुळे पहाड पोखरून खनिज संपत्ती ताब्यात घेणे कठीण जात आहे. तसेच मैतेई नां ST चा दर्जा नसल्याने ते आदिवासींच्या जमिनी विकत घेऊ शकत नाहीत. परिणामी या सर्व आदिवासी जमातींना तिथून हुसकावून लावण्यासाठी मणीपूर दंगल पेटवली असल्याचे बोलले जाते
    दंगलीचा कळस म्हणजे मणिपूर राज्यातील इम्फाळ पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या  गावातील "कुकी" या आदिवासी जमातीच्या दोन महिलांना पोलिसांच्या संरक्षणातून बाहेर काढून मैतेई पुरुषांच्या हिंस्त्र जमावाने विवस्त्र करून त्यांच्या नग्न देहाची विटंबना करण्यात आली.  या घटनेचा मागोवा घेतला असता ही घटना 4 मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या समक्ष ही घटना घडूनही पोलिसांनी त्यावर कोणतीही ॲक्शन घेतली नाही व FIR सुद्धा दाखल केले नसल्याचे सिद्ध झाले आहे. ही घटना 18 जुलै रोजी सोशल मीडियामुळे व्हायरल झाली तेव्हा FIR दाखल करण्यात आले आहे
         कुकी आदिवासी समुदायातील दोन महिलांना विवस्त्र करून फिरवण्यात आले, त्यांच्या देहाची क्रूरपणे विटंबना करण्यात आली. तसेच आरोपींना पकडण्यात पोलिसांची टाळाटाळ यावरून ही घटना राज्य पुरस्कृत असून  ही ब्राह्मणी भांडवली धर्मांध शक्तींच्या क्रूरतेचा कळस असल्याचे आम्ही मानत आहोत.
    आज दोन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. नरसंहार लेकी बाळींची अब्रू घेतल्या जात आहे.  मैतई या जातींना पूर्ण संरक्षण देऊन दंगल सुरू ठेवण्याचे कार्य भाजप सरकार करीत आहेत.  हेच या घटनेवरून निदर्शनास येत आहे.
    बेटी बचाव बेटी पढाव चा ढोल वाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशवाऱ्या करण्यात मशगुल होते मणिपूरमध्ये वेळीच लक्ष घातले असते तर देशाला लज्जास्पद आणि लांच्छनास्पद घटना घडली नसती.


    कुकी महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचाराने आम्ही अत्यंत संतप्त झालो आहोत. भाजपाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, अमित शहा यांचा राजीनामा ताबोडतोब घेत आरोपींना शिक्षा द्यावी. तसेच,  आमच्या मते ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. 

royal-telecom
royal-telecom


    मणिपूर मधील कुकी या आदिवासी जमातीच्या महिलांवर झालेला अत्याचार हा अतिशय निंदनीय आहे. या अमानवीय कृत्याच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज हे निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, शहराध्यक्षा वंदना नरवडे, जिल्हाध्यक्ष पुर्व प्रभाकर मामा बकले, जिल्हाध्यक्ष पच्श्रिम योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे,वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष जलीस अहेमद, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे,शहर महासचिव साधनाताई पठारे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई,गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, खुलताबाद तालुकाध्यक्ष मुख्तार सय्यद, वैजापूर तालुकाध्यक्ष सिध्दार्थ तेजाड, महिला आघाडीच्या शहर महासचिव साधनाताई पठारे,गंगापूर तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, कन्नड तालुकाध्यक्षा विद्याताई दिवेकर, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, निर्मला शेजवळ, शालिनीताई बर्फे, मंगल पठारे,शाहीर मेघानंद जाधव, सुशीलकुमार शिराळे, अँड नंदा गायकवाड, सुलोचना साबळे,सुमन दिवेकर,खूशबू शेख,एस पी मगरे, कान्हू भालेराव, शेख रफिक शेख सुलेमान, विशाल पठारे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom