संविधान न मानणारे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.
पोलिस आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन .
वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की सध्या महाराष्ट्रात वादग्रस्त वक्तव्य करून दगली घडू पाहणारे संभाजी भिडे हे उद्या दिनांक १ ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहरातील अग्रेसन भवन सिडको येथे व्याख्यान देण्यासाठी येणार असल्याची माहिती समाज माध्यमातून मिळत आहे संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा एक कलमी कार्यक्रम करत आहे जसे १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करू नका तिरंगा झेंडा फडकू नका असे वादग्रस्त संविधान विरोधी व्यकत्य वेगवेगळ्या ठिकाणी केले आहे एवढेच नाही तर महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी,शिर्डीचे साईबाबा यांच्या बद्दल सुध्दा वादग्रस्त वक्तव्य केले आहे अश्या वादग्रस्त व्यक्तीला औरंगाबाद शहरात कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी वंचित बहुजन आघाडी ची मागणी आहे या विषयी आपण गांभीर्य पुर्वक विचार करावा नसता होणार्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदारी राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, जिल्हाध्यक्ष योगेश बन जिल्हाध्यक्ष, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, युवा जिल्हाध्यक्ष सतिष गायकवाड, शहराध्यक्ष मध्य जलीस अहेमद, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा संघटक अँड सागरदास मोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई,शहर प्रचारक शाहीर मेघानंद जाधव,सयम सम्यकचे संकेत कांबळे, सतीश सुरडकर,राजू पगडे,शहर महासचिव कोमल हिवाळे,गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल,
आदींची उपस्थिती होती.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?