वंचित बहुजन आघाडीचा दणका, संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने आज पोलिस आयुक्त यांना निवेदन देऊन संभाजी भिडे यांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती या संदर्भात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पाटील साहेब यांच्याशी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि औरंगाबाद शहरात संभाजी भिडे याच्या कार्यक्रम झाल्यास शहरांत अशांतता निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी ठाम भूमिका आज घेण्यात आली कार्यक्रमाला परवानगी दिली तर वंचित बहुजन आघाडी कार्यक्रम उधळून लावेल अशी भूमिका घेतली होती या सर्व गोष्टींचा विचार करून मा पोलिस आयुक्त औरंगाबाद यांनी संभाजी भिडे यांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमाला परवानगी नाकारली असुन संभाजी भिडे यांना औरंगाबाद येथील कार्यक्रम रद्द करावा लागला आहे या पुढेही संभाजी भिडे सारख्या देशद्रोही लोकांनी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहर जिल्हयात केला तर त्याला वंचित बहुजन आघाडी विरोधच करेल असेही शेवटी प्रसिद्धी पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने म्हटले आहे सहायक पोलिस आयुक्त यांना भेटलेल्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगेश बन, शहराध्यक्ष मध्य जलीस अहेमद, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर,जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अँड लताताई बामणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, जिल्हा संघटक अँड सागरदास मोरे, प्रचारक शाहीर मेघानंद जाधव, सय्यकचे संकेत कांबळे, आदींची उपस्थिती होती.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?