लिंबे जळगाव ग्राम पंचायतीचा प्रताप, विरोधक/टिकाकारांची कामे करण्यास नकार
स्वच्छ अभियान अंतर्गत घंटा गाडीचा कचरा घेण्यास डायरेक्ट नकार
लिंबे जळगाव : ग्रुप ग्राम पंचायत लिंबे जळगाव अंतर्गत रहीमपूर गावात दोन दिवस आड अप्पे रिक्शा कचरा उचलण्यासाठी येते पण ही गाडी फक्त त्याच लोकांचा कचरा उचलते जे ग्राम पंचायत मध्ये सत्तेत आहेत आणि बाकीच्या नागरिकांचा कचरा घेण्यास कर्मचारी सरळ नकार देतात .
ग्राम पंचायत मतदान मध्ये विरोधक म्हणून निवडणूक लढवलेल्या व परास्त झालेल्या नागरिकांना ग्राम पंचयातचे कर्मचारी त्यांचे कामे करण्यास सरळ नकार देत आहेत आणि जाब विचारल्यास त्यांचे उत्तर असते की आम्हाला सत्ताधीशांच्या कडून पगार दिला जातो म्हणून आम्ही त्यांचीच कामे करणार .
सीमेंट रोड पेवर ब्लॉक आणि मुरूम सुद्धा फक्त सत्ता असण्याऱ्या लोकांच्याच घरापर्यंत
रहीमपुर गावात जेमतेम 2 ते 3 गल्ल्या आहेत तरीपण संपूर्ण गावात सीमेंट रोड नाही , फक्त काहीच ठराविक ठिकाणी सीमेंट रोड व पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत . आणि ज्या ठिकाणी दोन्ही नाही तेथे मुरूम रोड करण्यात आलेले आहेत . पण जे विरोधक होते त्यांच्या घरासमोर ना सीमेंट रोड ना पेवर ब्लॉक नाही मुरूम टाकण्यात आलेले आहेत . त्या ठिकाणी संपूर्ण चिखल होत असून पाणी साचत आहे . आणि याच पाण्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होत आहे .
पिण्यासाठी ही अशुद्ध पाणी
पाण्याची गुणवत्ता न तपासता सरळ विहीरीतून नळाला पाणी सोडण्यात येते.
गावांत कोणतीही समिति कार्यरथ नाही .
मतदान पार पडताच ग्राम पंचायतीला नवीन समित्या स्थापन करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता , पण कित्येक महीने लोटले तरीही कोणतीही समिति स्थापन करण्यात आलेली नाही .
बंद खोलीत पार पडते मासिक सभा
शासन निर्णय असून सुद्धा नागरिकांना मासिक सभेत सहभागी न करता ग्राम पंचायत अधिकारी आणि सर्व सदस्य एका बंद खोलीत ग्राम सभा घेतात व त्या दिवशी गावातील नागरिकांना ग्राम पंचायत कार्यालया बाहेर बसायला भाग पाड़तात .
वारंवार अर्ज करूनही ग्राम पंचायत कडून कोणतीही कार्यवाही नाही
सदरील प्रकरण लक्षात येताच काही नागरिकांनी वेळोवेळी लिखित अर्ज ग्राम पंचायत मध्ये सादर केले असता त्यांना तोंडी आश्वासणे देवून शांत करण्यात आले पण कित्येक दिवस लोटले तरी ही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही .
पंचायत समीती अधिकाऱ्यांना ही अर्ज/सूचना देण्यात आली होती त्यानीही ग्राम पंचायत कार्यालयाला टाकीत केले होती , पण त्यांच्याही ताकीदीला न जुमानता ग्राम पंचायत कार्यालय आपलेच अधिकार गाजवत आहे .
प्रकरण कोर्टात जाणार
वेळोवेळी अर्ज करून ही कोणतेच निर्णय होत नसल्याने याचिकाकर्ता आता कोर्टा पर्यन्त जाण्याच्या तयारीत.
What's Your Reaction?