शिंदे फडणवीस सरकारच्या कांदा निर्यात धोरणाच्या विरोधात महाविकास आघाडी व शेतकरी कृती समितीच्या वतीने २२/०८/२०२३ रोजी आंदोलन
भंव्य निदर्शने व कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर बंद
शिंदे फडणवीस सरकारच्या कांदा निर्यात धोरणाच्या विरोधात महाविकास आघाडी व शेतकरी कृती समिती गंगापूर च्या वतीने भंव्य निदर्शने व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद व कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या मंगळवार दिनांक 22/8/2023 रोजी सकाळी 10:00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरामध्ये भारत सरकार व शिंदे फडणवीस सरकारच्या कांदा निर्यात धोरणात 40% कर लावण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाविकास
आघाडी व शेतकरी कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन व कांदा मार्केट बंद करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकरी वर्ग,
सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते व कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी यांनी जास्तीत जास्त उपस्तित राहावे ही विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेस गंगापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील नीळ, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश मूथा, राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका प्रमुख विजय मनाळ, शेतकरी कृती समिती गंगापूर महेश गुज्जर, व आम आदमी पार्टी चे भाऊसाहेब शेळके यांनी केली आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?