हरेगाव अत्याचार प्रकरणी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन, वंचित बहुजन आघाडीची मागणी
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुक्याच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करून आज जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील उच्च वर्णीय मराठा समाजातील काही लोकांनी एकत्र येत माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून या गावातील बौद्ध तरूणांना झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण केली एवढेच नव्हे तर स्वतः थुंकले लघवी केली आणि ती त्या बौद्ध तरुणांना चाटायला लावली पुरोगामी महाराष्ट्रात अश्या घटना वारंवार घडत असुन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे कायद्यांचा धाक उरलेला नाही त्यामुळे नाना गलांडे ,युवराज गलांडे यांच्यासारखे लोक कायदा हातात घेऊन बौद्ध समाजावर अत्याचार करत आहे अश्या या घटनेवरून या लोकांना राजकीय राजआसर्य असल्याचे दिसून येते त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी निःपक्ष पणे चौकशी करावी व सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि सदरील घटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवुन द्यावा नसता वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करेल याची सर्व ती जबाबदारी राहील असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष अंजन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पी के दाभाडे, सतीष महापूरे ता उपाध्यक्ष,ज्ञानशील वाघमारे ता सदस्य, अशोक त्रिभुवन ता संघटक,धिरज खैरे , सुगंध दाभाडे कोषाध्यक्ष, जेष्ठ नेते जी डी खंडागळे, जेष्ठ नेते पंडितराव तुपे, रवि रतनपारखे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?