अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे बौद्ध तरूणांना केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणांचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गंगापूर तहसीलदार यांना दिले निवेदन

अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे बौद्ध तरूणांना केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणांचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार गंगापूर यांना भेटून त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना निवेदन पाठवण्यात आले निवेदनात म्हटले आहे की हरेगाव ता श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे काही दिवसांपूर्वी याचं गावातील उच्च वर्णीय मराठा समाजातील काही लोकांनी एकत्र येत गावातील बौद्ध तरूणांला आपल्या राहत्या घरी घेऊन जाऊन झाडाला उलटे टांगले आणि बेदम मारहाण केली एवढेच नव्हे स्वतः थुंकले लघवी केली आणि ती त्या बौद्ध तरुणांना चाटायला लावली इतके हीन कृत्य या लोकांनी हि अतिशय गंभीर बाब असून पुरोगामी महाराष्ट्राला अश्या घटना शोभणार्या नाहीत गेल्या वर्षभरापासून अश्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत असुन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे उच्च वर्णीय लोकांना कायद्यांचा धाक उरलेला नाही या अगोदर महाराष्ट्रात झालेल्या बौद्ध अत्याचार प्रकरणी कडक कारवाई सरकारने केली  असती तर अश्या घटना वारंवार घडल्या नसत्या पोलिसांचा धाक आणि सरकारचे पोलिसांवर नियंत्रण नसल्याचे हे लक्षण दिसते त्यामुळेच हरेगाव येथील उच्च वर्णीय मराठा नाना गलांडे  त्यांचा मुलगा युवराज गलांडे यांना अजूनही पोलिस अटक करत नाही यावरून या लोकांना राजकीय राजआसर्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते त्यामुळे या प्रकरणाची निःपक्ष पणे चौकशी साठी सरकारने हस्तक्षेप करून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी सदरील घटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवुन द्यावा नसता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे 
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल,ता महासचिव बाबासाहेब दुशिग,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष जयाताई सदावर्ते, शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे,ता सचिव गौतम हिवाळे , ता संघटक अमृतराव डोगरदिवे,महिला आघाडीच्या ता महासचिव ज्याती मंजुळे, नेवरगाव सर्कल अध्यक्ष सुमनबाई बनकर, अँड राहुल माघाडे,विशाल चित्ते, नबी खालू सुनील हिवाळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

royal-telecom
royal-telecom


royal telecom

royal telecom