अमरावतीत इमारत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
कोसळलेल्या 3 मजली इमारतीच्या खाली 4 ते 5 लोक दाबल्या गेले असल्याची आशंका व्यक्त करण्यात येत आहे.
अमरावती शहरातील गजबजलेल्या प्रभात चौकात असलेली जुनी आणि जर्जर झालेली इमारत आज दुपारी अचानक पणे कोसळली. कोसळलेल्या 3 मजली इमारतीच्या खाली 4 ते 5 लोक दाबल्या गेले असल्याची आशंका व्यक्त करण्यात येत आहे.
घटना घडली असताना या प्रकरणात जिल्हाधिकारी पवनीत_कौर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ड्युटीवर असणारे महापालिका आयुक्त अमरावती येताच या प्रकरणाची चौकशी सुरू होईलअसे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
व्यापारी लाईन मधे असलेल्या या बिल्डिंग मध्ये अनेक दुकान होती. अमरावती महानगरपालिकेने या आधीच बिल्डिंग जुनी व जर्जर झाल्याने खाली करावी म्हणून संबंधित व्यक्तींना सूचना केली होती. पण तरीही या बिल्डिंग मधे डागडुजी व दुरुस्ती करण्यासाठी काम सुरू होते।
मुख्यमंत्री यांनी अमरावती येथील इमारत दुर्घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली असून या घटनेच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अमरावती येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असून जखमींवरील उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे.
What's Your Reaction?






