गंगापूर तहसील कार्यालयासमोर उद्या वंचितचे निदर्शने
गंगापूर तालुक्यातील गायरान धारकांच्या विविध मागण्या घेऊन निदर्शने आंदोलन
गंगापूर: वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व युवक आघाडीच्या वतीने दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ मंगळवार रोजी दुपारी गंगापूर तालुक्यातील गायरान धारकांच्या विविध मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे,
काही दिवसांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यासह गंगापूर तालुक्यात गायरान अतिक्रमण काढण्यासाठी नोटीसा बजावल्या जात आहे.
या विषयावर वंचित बहुजन आघाडी ची भुमिका सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाच्या वतीने निदर्शने आंदोलनाचे आयोजन केले जाणार आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, तालुका महासचिव बाबासाहेब दूसिंग , महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाबाई सदावर्ते, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार, जिल्हा महासचिव सुनयना मगर, युवा तालुकाध्यक्ष नितीन शेजवळ, शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे, आदीं उपस्थितीत राहुन नेतृत्व करणार आहे या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, युवा आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी देण्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा. ➖➖➖➖➖➖➖ ???? ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील ???? व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा
What's Your Reaction?