गंगापूर तहसील कार्यालया समोर गायराण अतिक्रमण संदर्भात वंचित आघाडीचे निदर्शने
वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुका
गंगापूर : मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढण्यासंबधीची कार्यवाही राज्यभरात सुरु असुन याच कासवाई चे आदेश देणाऱ्या नोटीसा गायरान अतिक्रमण धारकाना तहसीलदारांच्या वतीने जमीन,घरे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात येत आहे, शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण दहा दिवसांत स्वतः काढून टाकावे अश्या नोटीसी दिल्या जात आहे सदर गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारक् हे मागील अनेक पिढ्यांपासून आपल्या कुटुंबासोबत तेथे राहतात त्याचप्रमाणे गायरान अतिक्रमण धारक हे अनुसूचित् जाती जमाती, अल्पसंख्याक,भटके विमुक्त, मायक्रो ओबीसी प्रवर्गातील आहेत औरंगाबाद सह राज्यातील सर्वच जिल्ह्यात नोटीसा बजावल्या जात असल्यामुळे गंगापूर तालुक्यातील गायरान अतिक्रमण धारक हवालदिल होऊन वंचित बहुजन आघाडीकडे न्याय मागण्यासाठी येत आहे त्याअनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडी गंगापुर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुण निवेदन देण्यात आले .
यावेळी रुपचंद गाडेकर, शेख युनुस रज्जाक पटेल, मा रत्नमाला पवार, मा जयाताई सदावर्ते, मा सुनयना मगर, मा सुलोचना साबले व सर्व वंचितचे कारकर्ते उपस्थित होते.
निवेदनात वंचित तर्फे मांडलेले मुद्दे
१) वंचित बहुजन वर्गातील शासकीय गायरन जमीनीवर ज्यांची घरे आहेत त्यांची घरे अतिक्रमण ठरवून त्यांना रस्तावर आणु नये २) मा. उच्च न्यायालयात या विषयावर न्याय मागण्यासाठी शासनाने प॒र्णविचार याचिका दाखल करावी
३) शासकीय गायरान जमीनीवरील १४ एप्रिल २०२२ पर्य॑तचे सर्व अतिक्रमण नियमित करण्यांत यावे
४) केंद्र सरकारच्या २०२४ पर्य॑त सर्वांसाठी घरे या योजनेचा माध्यमातून सर्व बेघराना घरे देण्यांत यावे व हे घरे देताना शासकीय भूखंडावर सुध्दा विना अट देण्यात यावे या मागण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्यांच्या निवेदन असून यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे .
बातमी देण्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा. ➖➖➖➖➖➖➖ ???? ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील ???? व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?