जिकठाण फाटा येथे दोन गटांमध्ये वाद सात मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
जिकठाण फाटा येथिल घटणा
(दि.१३) रात्री ९.३० च्या सुमारास जिकठाण फाटा येथे घडलेली घटना, याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला भाहे.
गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथील काहीं वर्षांपासून वास्तव्यास असलेला मिथुन मच्छिंद्र साळुंखे (१८)हा मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मित्र अविनाश निकमला घेऊन जिकठाण येथे अक्षय वाघले याच्या घरी परीक्षेविषयी चर्चा करण्यासाठी गेला होता. चर्चेनंतर ते तेघेही रात्री ९.३० च्या सुमारास जिकठाण फाटा येथे चहा घेण्यासाठी गेले. तेथून घराकडे परत येत असताना धनंजय फुलचंद खोमणे व काहीं मित्रांसोबत तेथे आला. त्याने मिथूनच्या गळ्यात-हात टाकून माइया चुलत्याला काय बोलला होतास, असा जाब विचारून गळा दाबला. तेवढ्यात अमोल खोमणे रोहित खोमणे, कृष्णा तोडकर, तुषार जाधव, अभिषेक खोमणे, सिद्धेश्वर खोमणे तेथे आले व त्यांनी मिथुन सह अविनाश व अक्षयला मारहाण करीत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तेथे आलेले शाहीद पटेल, इकबाल पटेल, शफीक पटेल यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. जखमी मिथुनला जिकठाण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी मिथुन साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि. -सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. दशरथ खोसरे करीत आहेत.
What's Your Reaction?