आपणाला जाती धर्मात अडकविणारेच सर्वात मोठे गुंड

अभिनेते नाना पाटेकरांचे परखड मत.


royal telecom

royal telecom

कराड : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरु गाडगेबाबा महाविद्यालय कराड येथे ४२ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाना पाटेकर यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

इंथ येण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्हाला चार गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजून घ्यायचं आहे. सभोवताली जे काही चाललंय त्याकाळात ज्यांच्याकडून आशा ठेवाव्यात ते म्हणजे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांनी काही नाही करावं हे लक्षात यायला हवं. मी तुम्हाला खरं सांगतो मोबाइल घेतला तेव्हापासून फोनची रिंग वाजली नाही. मला असं वाटतं तरुणाईनं फोनपासून लांब राहिलं तर चांगलं होईल,असं नाना पाटेकर म्हणाले.

नाना पाटेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नाना पाटेकर यांना विविध प्रश्न विचारले. जे तुम्हाला जाती धर्मांमध्ये अडकवतात ते समाजातील सर्वात मोठे गुंड आहेत, असं नाना म्हणाले. विद्यार्थ्यांनी जात आणि धर्म पाळणार नाही, अशी शपथ घ्यायला हवी,असं नाना पाटेकर म्हणाले.

royal-telecom
royal-telecom