लिंबे जळगाव येथील भवानी वस्ती जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद नगरी उत्साहात साजरी

लिंबे जळगाव : गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथील भवानी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानी वस्ती या ठिकानी दि.22 गुरुवार रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी उपस्थिति शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष कडू हसन सय्यद तसेच शाळेचे मुख्याध्यापक गौस खान पठान, सदस्य मनामत शेख़, रूपचंद गाडेकर, कर्मचारी विश्वनाथ पडघन व गावातील प्रतिष्टीत नागरिक शौकत खा शेर खा पठान ग्रामस्थ व पालक त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सन्माननीय मान्यवरांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध पदार्थांचा, पाककृतींचा आनंद घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले झालेल्या .या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार करत असताना कशा पद्धतीने करावा याचे ज्ञान मिळाले तसेच गणितातील नफा-तोटा ही संकल्पना देखील त्यांना या वेळी समजली.
What's Your Reaction?






