औरंगाबाद जिल्ह्यात भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 51 पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करणार
26 जानेवारिला भारत देशाच्या 75 व्या गणतंत्र दिनानिमित्त वसंत भालेराव मित्र मंडळ मार्फत
औरंगाबाद: भारत देशाच्या 75 व्या गणतंत्र दिनानिमित्त वसंत भालेराव मित्र मंडळ मार्फत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 51 पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अफाट कष्टातून, अफाट अभ्यासातून तसेच वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनुभवातून भारतीय संविधान निर्माण करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून भारत देशाला भारताची राज्यघटना बहाल केलेली आहे. भारतीय राज्यघटनेमुळे भारतातील लोक भारत देशात तसेच जागतिक स्तरावर सुख-शांती, सुरक्षित आणि समृद्धपणे जीवन जगत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महत्त्वपूर्ण योगदान बद्दल आम्ही वसंत भालेराव मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 51 पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करणार आहोत. तसेच सर्व जनतेला आवाहन करत आहोत की 75 वा भारत गणतंत्र दिन साजरा करायचा आहे आणि आपल्या भागातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ही पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना आणि धन्यवाद द्यायचे आहे.
या उपक्रमात स्वतः वसंत भालेराव, राजू पडवळ, शिरीष येळमकर, कैलास भालेराव, राकेश भालेराव, महेंद्र दाभाडे, दादाराव जाधव, प्रीतम वाघमारे, किशोर वाघमारे, अनिकेत गायकवाड, राजेश मित्रे, सचिन गायकवाड, शफी अन्सारी, सुनिता ताई बनसोडे, राजश्री साठे, मनोज पडवळ, राजू खोतकर, संतोष भोसले, बबनराव जेधे, रुपेश जाधव, धीरज विश्वासे, प्रशांत जगताप, रंजीत कांबळे या सर्वांचा प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्षपणे सहभाग आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?