मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना (अल्पसंख्याक विकास विभाग )
परतफेड शिक्षणपूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षे.
योजनेचे स्वरूप
- कर्ज मर्यादा रु. 2.50 लाखापर्यंत.
- व्याजदर- फक्त 3%.
- 100% कर्ज.
- परतफेड शिक्षणपूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षे.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखापर्यंत.
- विद्यार्थ्यांचे वय: 18 ते 32 वर्षे.
आवश्यक कागदपत्रे -
- विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती.
- अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
(आधार कार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक ( Passport)/ बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / दूरध्वनी देयक / विद्युत देयक किंवा तलाठी / तहसिलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक) - ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे
(आधार कार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक ( Passport) / बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक) - उत्पन्न प्रमाणपत्र :
कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं. 16. - विहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र
- 7) बेबाकी प्रमाणपत्र: महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे / वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज / थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे / वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मुळ प्रतीतील शपथपत्र.
- जामिनदार :
सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणार व्यक्ती) किंवा स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करुन घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती - 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा) - शैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह / घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक.
नोट:-दारिद्र्य रेषेखालील उमेदवारांनी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
बातमी देण्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?