हाशम शेख यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड

ग्रुप ग्राम पंचायत लिंबे जळगांव (रहीमपूर/अब्दुलपूर)

हाशम शेख यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

लिंबे जळगाव : ग्रुप ग्रामपंचायत लिंबे जळगाव (रहीमपूर/अब्दुलपूर) ता. गंगापूर भागात महत्त्वाची समजली जाणाऱ्या लिंबे जळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी हाशम शाहणुर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली. सरपंच नवनाथ वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांनी काम पाहिले. या प्रसंगी हाशम शेख यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहिर करण्यात आले. याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य अनिस सय्यद, समीर सय्यद, युनूस पटेल, मुसा शेख, सविता रुपचंद गाडेकर, आसराबाई उध्दव दाणे, शेख सुमय्या इरफान, शांताबाई ज्ञानेश्‍वर जाधव  हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच रुपचंद गाडेकर, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन कारभारी पाटील गोलांडे, बंचित, माजी सरपंच काकासाहेब दाणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, सय्यद हारून गुलाब पटेल, शेख मानामत रज्जाक पटेल,आदी सह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी हाशम शेख यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. .

royal-telecom
royal-telecom

बातमी देण्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा. 

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.


royal telecom

royal telecom