लिंबे जळगाव : स्पीड ब्रेकर असून अडचण, नसून खोळंबा
सुरक्षेसाठी बनवलेले स्पीड ब्रेकर ठरताहेत दुर्घटनेचे कारण
चौकातील लोकांच्या सुरक्षेचा विचार करून स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत, मात्र येथेच ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. याचा सर्वाधिक त्रास दुचाकी चालकांना होतो. मोटारसायकल स्वार अनेकदा गोंधळून जातात त्यामुळे मोटारसायकल असंतुलित होते. काही वेळा मागे बसलेली व्यक्ती आणि महिलाही अपघाताला बळी पडतात. चारचाकी वाहनांचे एक्सल रोज तुटत आहेत.
एकाच दिवशी दोन घटना
आज दिनांक १७-०१-२०२३ रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळीच एक कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढली पण सुदैवाने कोणतीही जिवित हानि झालेली नाही, अपघाताच्या वेळी वाहनाच्या धडकेने दुभाजकावरील कठड़े तुटले आहे .
दूसरी घटना
स्पीड ब्रेकर चा अंदाज न आल्याने एक मालवाहु ट्रक ऐन स्पीड ब्रेकर वर येताच ट्रक चे समोरचे पाठे तुटून पडले त्यामुळे ट्रक भर रस्त्यावरच उभा राहिला त्यामुळे लोकांना थोडेफार ट्रफिकचा त्रास सहन करावा लागला।
कोणतेही निश्चित मानक नाही
खरेतर ब्रेकरच्या स्थापनेसाठी कोणतेही निश्चित मानक नाही.रोडवर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर इतके उंच किंवा छोटे करण्यात आले आहेत की वाहनचालक चक्रित होतात. नियमानुसार, चालकाला सतर्क करण्यासाठी स्पीड ब्रेकरच्या 50 ते 80 मीटर आधी इशारा फलक लावणे आवश्यक आहे. नियमानुसार थर्माप्लास्टिक बारवर पेंटसह मार्किंग असणे आवश्यक आहे.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?