जीकठाण फाटा ठरतोय अपघाताचे ठिकाण, काल रात्री पुनः अपघात - दोन जन जखमी
स्पीड ब्रेकर बसवण्याची ग्रामस्थांची मागणी

लिंबे जळगाव : अहमदनगर कडून भरधाव येणारी एसयुव्ही कार आणि दुचाकी यांच्यात जोराची धडक झाल्याने दुचाकी वरील दोन जण जखमी झाले. जखमीतील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. जखमींना रुग्णवाहिकेने उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात गुरुवारी (ता.19) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव परिसरातील जिकठाण फाट्यावर झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, एसयुव्ही (जी जे 18, बी एस -3577) ही औरंगाबाद – नगर हायवेने अहमदनगरकडून औरंगाबादकडे येत होती. तर दुचाकी (एम एच 20, जी एफ -3222) ही जीकठाण गावातून औरंगाबादच्या दिशेने जात होती.ही दोन्ही वाहने जिकठाण फाट्यावरील चौकात येतात त्यांच्यात जोराची धडक झाली. अपघातात दुचाकी वरील दोन जण जखमी झाले. गुरुवारी (ता.19) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच अलीम शेख (अज्ञात) यांनी ॲम्बुलन्स ला बोलावले व ॲम्बुलन्स अपघातस्थळी धाव घेऊन जीकठाण,रहीमपूर व लिंबे जळगाव येथील काही ग्रामस्थानी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामध्ये जखमी झालेल्या अक्षय जाधव (जीकठाण) या तरुणाच्या डाव्या पायाचा पंजा आणि घोट्याच्या वर पाय मोडला आहे. तसेच शशिकांत पुरी (दहेगाव बंगला) याला मुक्का मार लागला आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






