सतरा वर्षांपासून शाळेवरील शिक्षक वेतनापासून वंचित
गुरू धानोरा येथील छत्रपती विद्यालयातील प्रकार
गुरुधानोरा (ता गंगापूर) शिवाजी तांबे प्रतिनिधी: येथील छत्रपती विद्यालय हे ज्या शिक्षकाच्या कालखंडात उभे राहिले त्याच शिक्षकावर तब्बल 17 वर्ष वेतनापासून वंचित राहिल्याचा प्रकार समोर येत आहे. छत्रपती विद्यालयातील सहशिक्षक हरिभाऊ सुसे हे 2005 पासून या विद्यालयावर अध्यापनाचे काम करत असून शाळा प्रशासनाने माझ्यावर अन्याय केल्याचा घनाघाती आरोप सुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. शासन अनुदानात कुठल्याही नियमाच्या आधीन न राहता नवीन लोकांचा समावेश करून जुन्या लोकांवर शाळा प्रशासनाने अन्याय केल्याचे सूसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. विना वेतन शाळेवर काम करत असल्यामुळे सुसे यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे. छत्रपती विद्यालयाला सात टक्के अनुदान असताना आतापर्यंत शिक्षक सुसे यांना वेतनापासून का वंचित ठेवल्या जात आहे असा प्रश्न स्थानिकांना सतवत आहे.
माझ्यावर झालेला अन्याया बाबद मी न्यायालयाकडे न्याय मागितला परंतू माझी परिस्थिती हालाखीची असल्याने मी आर्थिक बाबीत पुरू शकत नाहीं. यामुळें दोन वेळेस मी शाळा प्रांगणात आत्महत्येचा देखील प्रयत्न केला आहे. योग्य तो न्याय मला न मिळाल्यास मी 26 जानेवारी पासून शाळा प्रांगणात अमरन उपोषण करणार आहे.
हरिभाऊ सुसे
( सह शिक्षक छत्रपती विद्यालय गुरु धानोरा)
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?