दिव्यांग निधी वाटप व इतर समस्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना तर्फे निवेदन
अपंग जनता दल सामाजिक संघटना औरंगाबाद जिल्हाध्यक्ष जावेद शेख
लिंबे जळगाव : दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींना २५ जून रोजी दिले होते, पण हा निधी लाभार्थ्यांना मिळालेला नाही त्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना तर्फे जिल्हा अध्यक्ष जावेद शेख यांनी ग्रुप ग्रामपंचायत लिंबे जळगाव (रहीमपूर/अब्दुलपुर) च्या कार्यालयात आज रोजी दिनांक 21 जानेवारी (शनिवार) 12.10 वाजता निवेदन दिले. त्यावेळी कर्तव्यदक्ष सरपंच नवनाथ वैद्य, ग्राम विकास अधिकारी मुळे सर, उपसरपंच हशम शेख, सदस्य मुसा शेख, अनिस सय्यद, समीर सय्यद, वंचित बहुजन आघाड़ी गंगापुर तालुखा अध्यक्ष युनूस पटेल, नवनाथ निरफळ, भगवान जाधव, सरसेनानी चे संपादक रुपचंद गाडेकर, हारून सय्यद, जमील शेख, साबेर सय्यद तसेच राईटपोस्ट चे प्रकाशक व मुख्य संपादक जमीर अमीर शेख हे उपस्थीत होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?