पीक विम्यावरून शेतकऱ्यांचा संतापाचा सूर; गोरेगाव-जिंतूर मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी शासनाचा केला निषेध
तालुका कृषी अधिकाऱ्याचे आश्वासन फेटाळले
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा तसेच मागील वर्षीची 13 कोटी 89 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत, शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
मागील चार दिवसापासून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना शुक्रवारी काळे झेंडे दाखवले. तर भगवती येथे काही शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलना नंतरही प्रशासन जागे झाले नाही. यामुळे आज शेतकऱ्यांनी गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प केली. तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान सेनगाव तालुका कृषी अधिकारी या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी शेतकऱ्यांची भेट घेतली. पिक विम्याच्या प्रश्नावर शासनाला कळविले आहे. विमा कंपनीकडून लवकरच योग्य निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करू असे मोघम उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकरी संतप्त झाले.
मागच्या वर्षीची ही रक्कम मिळाली नाही यावर्षीही तुटपुंजी विम्याची रक्कम मिळत आहे असे सांगत तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन फेटाळून लावली. त्यामुळे आता हे आंदोलन चांगलेच पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी ही सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. तर पीक विम्याचे प्रश्नावर रविवारी सेनगाव गोरेगाव व हिंगोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
#हिंगोली - पीकविमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील गोरेगाव येथे #आमरण_उपोषण सुरू केले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आज गोरेगाव-जिंतूर मार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.
— AIR News Aurangabad (@airnews_arngbad) January 21, 2023
पीटीसी - @RameshK68092416 pic.twitter.com/vo2MOXdgHz
उद्या हिंगोली बंदची हाक
ज्या कृषीमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलं आहे, त्याच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी उपोषणाला बसावं लागत आहे. पीक विमा आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. उद्या (22 जानेवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोली बंदची हाक देण्यात आली आहे. पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या चार दिवसांपासून पीक विम्याचा परतावा मिळावा यासाठी आंदोलन सुरु आहे. अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे स्वाभिमानीच्या वतीनं आज आक्रमक पवित्रा घेत गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ करण्यात आली.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?