अखेर त्रस्त शिक्षकांने दिला आमरण उपोषणाचा इशारा
गुरु धानोरा येथील छत्रपती विद्यालयातील प्रकार
शिवाजी तांबे शेंदुरवादा प्रतिनिधी: गुरुधानोरा (ता गंगापूर) येथील छत्रपती विद्यालयातील शिक्षक मागील सतरा वर्षांपासून वेतनापासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती विद्यालयातील शिक्षक हरिभाऊ सुसे हे 2005 पासून या शाळेवर कार्यरत आहे.शाळेला अनुदान प्राप्त झाल्यानंतरही सूसे यांना वेतनापासून अद्याप वंचित ठेवण्यात आले आहेत.जुन्या शिक्षकांना अनुदानाच्या वेतनश्रेणी पासून वंचित ठेवत नवीन शिक्षकांची बोगस भरती करून सरकारी अनुदान लुटण्याचे काम संस्था अध्यक्षांनी केला असल्याचा घनघाती आरोप शिक्षक सुसे यांनी शाळा प्रशासनावर केला आहे.शिक्षक सुसे यांना सविस्तर माहिती विचारले असता शाळा प्रशासनाने आतापर्यंत मला उडवा उडवीचे उत्तरे दिल्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे सूसे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे. सुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री संदीपान भुमरे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, खासदार इम्तियाज जलिल, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलीस आयुक्तालय औरंगाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, शिक्षणाधिकारी कार्यालय औरंगाबाद, चिप मिनिस्टर ऑफिस मुंबई यांच्या कार्यालयाला निवेनाद्वारे कळवले आल्याचे सांगीतले आहे.
चौकट
उपोषणावेळी जर माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राजकीय अथवा शासकीय दबाव तंत्राचा वापर केल्यास मी व माझी कुटुंब आत्महतनाचा मार्ग स्वीकारेल व या सर्वस्वी जबाबदार शाळा प्रशासन राहील असे देखील सूसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
प्रतिक्रिया
मी वारंवार शाळा प्रशासनाला वेतनाबाबत विनवण्या करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने व नुसते आश्वासन देत असल्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे यामुळे हा मार्ग मी स्वीकारला आहे.
*हरीभाऊ सुसे*
(सहशिक्षक छत्रपती विद्यालय गुरू धानोरा)
alt="">
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?