रहीमपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर

लिंबे जळगाव : गंगापूर तालुक्यातील रहीमपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक 7:30 वाजता सन्मान मुख्याध्यापक उमरसिंग जोणवाल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षण समिती चे अध्यक्ष तसेच सर्व सदस्य आणि समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेच्या ग्राउंड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले असता ग्रामस्थांकडून कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद दिला व मुलांना आपल्या परीने प्रोत्साहन बक्षिसे दिले. मुख्याध्यापक जोनवाल सर यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या दानीवृत्ती बद्दल शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांना भरभरून शुभाशीर्वाद दिले. व शाळेबद्दल आपुलकी दाखऊन आपले उत्तम कर्तृत्व पार पाडावे असे आवाहन केले .सदर छोटेखानी कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष परवीन जाकिर शेख व त्यांचे पती जाकीर अमीर शेख उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ महेताब पठाण, हारून गणी शेख (गुड्डू), जावेद मगबुल शेख, शकील गफुर शेख, समीर अमीर शेख, अझहर बुरहान शेख, फेरोझ मेहताब पठाण, साजेद असिफ सय्यद, असिफ जमाल शेख व राईटपोस्ट चे प्रकाशक व मुख्य संपादक जमीर अमीर शेख व इतर ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शालेय शिक्षक शेख मॅडम यांनी यांनी केले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






