रहीमपूर/अब्दूलपूर गावातील सांडपाणी/मैलापाणी चा सुटणार प्रश्न
ग्रुप ग्राम पंचायत लिंबे जळगाव नवनिर्वाचित सरपंच नवनाथ वैद्य यांच्या पुढाकाराने मिळाले 9 लाख रुपये

लिंबे जळगाव : गंगापूर तालु्यातील लिंबे जळगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहीमपूर/अब्दूलपूर ही दोन गावे, लोकसंख्या एका हजाराच्या वर असून गावात एक ही सार्वजनिक शौचालय गृह नाही सार्वजनिक नळ नाही सार्वजनिक वाचनालय नाही दोन्ही गावात एक ही सार्वजनिक वस्तु किंवा वास्तु नाही आणि सांडपाण्याची विल्हेवाट सुद्धा नाही . असले कित्येक तरी प्रश्नांनसोबत गावकरी आपले जीवन व्यतीत करीत आहेत . गावातील हद्दीत अनेक मोठ मोठाले व्यावसायिक कारखाने आहेत . गावातील प्रत्येक नागरिक शेतकरी असून काही नागरिक काम धंदा करतात त्या मुळे गावातील समस्या आणि प्रश्न पाहण्यासाठी लोकांकडे वेळ नाही कारण की संपूर्ण गाव कामावर निर्भर आहे , ग्रामस्थांना राजकारणात रस नाही आणि याचाच फायदा राजकारणी लोकांना होतो.
गावात अंगणवाडी ते 8 वी पर्यन्त जिल्हा परिषद ची शाळा आहे पण शाळेला कुंपण पण नाही शाळेत मोकाट जनावरांचा फोजफाटा नेहमी असतो , शाळा बंद असली की जनावरे आणि गावातील टवाळ पोर शाळेच्या आवारात घाण करतात आणि शाळा सुरू झाली की शाळकरी मुलांना शिक्षण सोळुन घाण साफ करावी लागते कारण की शाळेत सफाई कर्मचारी पण नाहीत, असो
2022 च्या डिसेंबर मध्ये ग्रामपंचायत चे मतदान झाले आणि नवीन ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच आणि बॉडी निर्माण झाली आणि कित्येक तरी वर्षापासून रखडलेल्या कामाला सुरुवात झाली .
15 व्या वित्त आयोग जाहीर झाले आणि रहीमपूर/अब्दूलपूर साठी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेत दोन्ही गावासाठी 9 लाख रुपयाची तरतूत करण्यात आली होती आणि त्याला जसे च्या तसे ठेवता, नवीन कार्यभार सांभाळलेल्या सारपंचांनी (नवनाथ बालचंद वैद्य) यांनी गावाला पहिली भेट म्हणून 9 लाख रुपये चा निधी दिला, यामुळे गावातील सांडपाणी/मैलापाणी प्रश्न सुटणार आहे , त्यामुळे गावातील नागरिकांनी सारपंचांचे आभार व्यक्त केले आणि असेच विकास कार्य करत रहावे अशी विनंती केली .
आणि गावातील या शुभकार्याचे उद्घाटन स्वतः सारपंचांनी करावे असे गावातील काही सुजक नागरिकांनी केले आहे त्यामध्ये राइटपोस्ट चे मुख्य संपादक जमीर अमीर शेख , AIMIM चे ग्राम अध्यक्ष समीर पठाण, हारून गणी शेख , फेरोज महेताब पठाण, अझर बुरान शेख , मोहम्मद गुलबास शेख , कैलास नवनाथ जाधव, सिद्धेश्वर गंडे इत्यादि ने राइटपोस्ट चॅनल च्या द्वारे विनंती केली आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






