बंद कारखाना सुरू करण्याचे दोन्ही पॅनलचे आश्वासन गंगापूर , आज मतदान..
आज १२ फेब्रुवारीला होणार मतदान आणि १३ फेब्रुवारीला मतमोजणी
गंगापूर: २००८ पासून गंगापूर कारखाना बंद आहे. गेल्या 15 वर्षापासून बंद असलेला आणि बँकेने कर्जवसुलीसाठी भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी आज (ता.१२) रोजी मतदान होत आहे. गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि ठाकरे गटाचे माजी चेअरमन कृष्णापाटील डोणगांवकर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे.
जिकठान येथिल मतदान केंद्रावर मतदाप्रक्रिया सुरू आहे आणि केंद्रावर चांगलीच गर्दी दिसून येत आहे. सर्व सभासद कारखाना सुरू व्हावा या आशेने मतदान करायला आलेले असून शांतापूर्ण मतदान करत आहेत.
१३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील हा कारखाना असून आरोप-प्रत्यारोप आणि अपहार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे यामुळे तो राज्यभरात चर्चेत आला होता.
शिवशाही सहकार पॅनलच्या कृष्णापाटील डोणगांवकर यांनी बंब यांच्यावर कारखाना बुडवल्याचा आरोप करत तो वाचवण्यासाठी आम्हाला मत द्या, असे आवाहन केले आहे.
२१ संचालक मंडळापैकी एक संचालकाची निवड याआधीच बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित २० संचालकासाठी ४० उम्मीदवार रिंगणात आहेत. आज , (ता.१२) सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात झालेली आहे.
माजी चेअरमन कृष्णापाटील डोणगावकर यांनी संचालक मंडळावर अपहाराचे आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून गंगापूर सहकारी साखर कारखाना राज्यभरात चर्चेत आला होता. आता हाच कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन बंब आणि डोणगावकर यांच्या पॅनलने दिले आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?