लिंबे जळगाव मध्ये क्युरीआ (Curia) इंडिया प्राइवेट लिमिटेड तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
Y4D फाउंडेशन चा नवीन प्रयास , Y4D बहूद्देशीय संस्था तर्फे आयोजन करण्यात आले होते.
लिंबे जळगाव: क्युरीआ (Curia) इंडिया प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद , Y4D फाउंडेशन बहूद्देशीय संस्था औरंगाबाद सातारा आणि ग्रुप ग्राम पंचायत लिंबे जळगाव (रहीमपूर/अब्दूलपूर) यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात मोफत नेत्र चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब तपासणी व इतर मार्गदर्शन यांचा समावेश होता. मोफत आरोग्य तपासणी शिबिरास लिंबे जळगावच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लिंबे जळगाव ग्राम पंचायत कार्यालयामध्ये हे शिबिर झाले आयोजित करण्यात आले होते . गरजूंना मोफत औषधे आणि मार्गदर्शन देण्यात आले. रुग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन नवनिर्वाचित सरपंच नवनाथ वैद्य , ग्राम विकास अधिकारी मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे गंगापूर तालुका अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य युनूस शेख, समीर सय्यद(सदस्य), शालेय समिति अध्यक्ष हारून सय्यद, मुजम्मील शेख, नवनाथ निरपळ, भगवान जाधव, शाळेचे सर, डॉ. प्रीति राजगुरु, डॉ. युनूस शेख, अंजली खंडाळे, राहुल काळे, रवींद्र भागडे, पवन दाभाडे, अमोल D. आदी उपस्थित होते.
सध्या परिसरात थंडी, ताप, सर्दी, खोकला, यांसारख्या साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. साथीच्या आजारामुळे मुलांचे शाळेतील हजेरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर फायदेशीर ठरणार आहे. शिबीरामध्ये दोन डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली.
सर्व ग्रामपंचायत तर्फे क्युरीआ (Curia) इंडिया प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद , Y4D फाउंडेशन बहूद्देशीय संस्था औरंगाबाद, सातारा यांचे आभार मानण्यात आले .
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?