मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ 14 फेब्रुवारी रोजी लिंबे जळगाव बंद चे आव्हान
लिंबे जळगाव कडकडीत बंद
लिंबे जळगाव : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष
योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा प्राणांतिक उपोषण सुरू
केले आहे.त्यांची प्रकती खालावत चालली असताना शासन व
मीडिया दोघेही याकडे दुर्लक्ष करत आहेत.शासनाचे याकडे लक्ष
वेधण्यासाठी सकल मराठा समाजाने उद्या दिनांक १४ रोजी
महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.त्यास प्रतिसाद देत लिंबे जळगाव सकल मराठा समाजाने तालुका बंद ची हाक दिली असून
आपल्याला अत्यावश्यक बाबी वगळता शांततेच्या मार्गाने हे
आंदोलन पार पाडावयाचे आहे,तरी सकल मराठा समाजाच्या
मागणीला पाठिंबा देण्यासाठी गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले
व्यवसाय बंद ठेऊन सहकार्य करावे तरी जळगावतील
सर्व व्यवसायिकांनी आपली दुकाने फर्म बंद ठेवून सकल मराठा
समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात
उपोषणास पाठिंबा द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः उद्याच्या बंदच्या काळात कोणीही रास्ता रोको करू नये, अथवा जाळपोळ करू नये ,आणि बंद शांततेत पाळून सहकार्य करावे असेही आवाहन लिंबे जळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
*लिंबे जलगांव सकल मराठा समाज*
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?