डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांचा सर्व समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षामध्ये प्रवेश
वैजापूर तालुक्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश
गंगापूर: गंगापूर विधानसभा मतदार संघातून निंवडपूक लढवू इच्छिणारे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी रविवारी शरंद पवार यांच्या जाहीर सभेनंतर आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे यांच्याकडे दिला आहे. आणि सोमवारी लगेच आपल्या सर्व समर्थकांसह शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
वैजापूर तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) उमिद्वार यांच्या प्रचार सभे साठी आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरद पवार गट) गंगापूर चे तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी वैजापूर येथे अशू भैया शेख, नवनाथ निरफल, योगेश दिवटे, तोगे भैया, किशोर गवांदे, गणी शेख, जुनेद पटेल, साहिल पटेल इत्यादी समर्थक उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?